ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा, मुंबईत वाहतूक कोंडी

मुंबई, दि. २९ - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमुळे मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. खासदार राजू शेट्टी आज चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करुन लालबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांमुळे मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

आत्मक्लेश यात्र काल मुंबईत दाखल झाली. या यात्रेमुळे पनवेलहून मुंबईत येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाशीच्या खाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

दरम्यान सदाभाऊ खोत सध्या सत्तेत आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाही, म्हणूनच ते स्वागताला येऊ शकले नाहीत, असा टोला यावेळी राजू शेट्टींनी लगावला.

पुण्यातून २२ मे रोजी खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करुन आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.

शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे.