ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पैसे नसल्याने बालचित्रवाणी बंद, सर्व कर्मचारी आजच कार्यमुक्त

मुंबई, दि. ३१ - पुण्यातील बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रक्कम नसल्यामुळे आणि ५० पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इतकंच नाही तर आजच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. बालचित्रवाणीऐवजी आता - बालभारती ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत.

बालचित्रवाणीचे कार्यक्रम दूरदर्शनवर चालत नाहीत. जे दुकान चालत नाही, ते चालू ठेऊन काय उपयोग? एखाद्या संस्थेवर इमोशनल होऊन आपण त्याचं नुकसान करण्यापेक्षा, काळानुरुप ती कशी बदलेल, टिकवता येईल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवता येईल ह्यावर माझा जोर आहे, असं सांगत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बालचित्रवाणी कायमची बंद होणार असल्याचे संकेत दिले होते.