ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकरी संपावर गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही

सोलापूर, दि. ३१ - शेतक-यांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनीही असेच वादग्रस्त विधान करून असंवेदनशीलता दाखवली आहे. राज्यातील शेतकरी येत्या जूनपासून संपावर जाणार असून शेतकऱ्यांच्या या संपाने आम्हाला काही फरक पडणार नाही, असे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सोलापूरातील एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

संप करणे कोणत्याही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही, अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी उधळली. त्यामुळे एक नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. माधव भंडारी म्हणाले, विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली होती. त्यांच्या संघर्ष यात्रेला किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर आमदार बच्चू कडूंनीही सरकारच्या विरोधात आसूड यात्रा काढली. आता खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेष यात्राअशा यात्रांमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. हे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. खासदार शेट्टींचे काय दुखणे आहे, हे अजून तरी आम्हाला कळाले नाही.

भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे केली. तूर, हरभरा, ऊस यासारख्या नगदी पिकांना हमीभाव मिळवून दिला. दुधाला भाव वाढवून दिला. शेती उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते, त्या वेळी भाव पडतात हे त्रिकाल सत्य आहे. तरीही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून सरकारने ४० टक्के तुरीची हमीभावाने खरेदी केली. तूर विक्रीमध्ये काही व्यापारी आणि दलालांनी घोटाळे केले आहेत. अशा लोकांची चौकशी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे, असे भंडारी यांनी सांगितले