ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्याच्या कचरा प्रकल्पासाठी पिंपरी सांडसची जागा - मुख्यमंत्री

मुंबई, दि. १ - पुणे शहरातील कचरा प्रकल्पासाठी पिंपरी सांडस येथील १९.९० हेक्टर जागा पुणे महापालिकेला शास्त्रोक्त पद्धतीने कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हस्तांतरीत करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून जाहीर केली. या त्यांच्या घोषणेमुळे पुणेकर नागरिकांची किमान आता तरी कचरा कोंडीतून मुक्तता झाली असून दुस-या बाजूला आजच त्या भागातील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तेथे कचरा प्रकल्प करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 पुणे महापालिकेला उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी मागील महिन्यात तेथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकून देण्यास तीव्र विरोध केला होता. हा कचरा प्रश्न मार्गी लागण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात येऊन प्रश्न सोडवावा लागला. त्यावर कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले असून त्यानुसार महापालिका प्रशासनाचे काम देखील सुरू आहे. 

मात्र, या सर्व घटनाक्रमापूर्वी पिंपरी सांड्स येथील वन खात्याची १९.९० हेक्टर जागा महापालिकेला लवकरच राज्य सरकार देणार अशी चर्चा मागील काही महिन्यापासून पुणे जिल्ह्यात सुरु होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थ आक्रमक होत. त्या ठिकाणी कचरा प्रकल्प करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. रास्ता रोको देखील त्यांनी अनेक वेळा केला. त्यांचा विरोध लक्षात घेता. या जागेची मोजणी सॅटलाईटदारे करण्यात आली. 

या सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पार पाडल्या असून आज मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून पिंपरी सांड्स येथील जागा कचरा प्रकल्पासाठी महापालिकेला हस्तांतरित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या प्रकल्पाला त्या भागातील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोध दर्शवल्याने या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.