ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बेळगावात ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या एसटीचे जोरदार स्वागत

बेळगाव, दि. ३ - महाराष्ट्र परिवहन महामंडळाचीजय महाराष्ट्रलिहिण्यात आलेली पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी बसचे जंगी स्वागत केले. तसेच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केले.

कर्नाटकातजय महाराष्ट्रम्हटल्यास लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचा कायदा करण्याची धमकी कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिली होती. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक एसटी बसवर जय महाराष्ट्रात लिहिण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी मुंबईहुन निघालेली मुंबई-बेळगाव बस रात्रीसाडे नऊच्या दरम्यान बेळगाव स्थानकावर पोहोचली. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर, कंडक्टरला फेटा बांधून प्रवाशांना पेढे वाटले.