ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नाशिकमध्ये भाजप आमदार, खासदारांना शेतकऱ्यांनी हाकललं

नासिक, दि. ३ - शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता पुणतांब्यावरुन नाशिककडे वळल्याचं चित्र आहे. कारण नाशिकच्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन पुढं सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर या बैठकीला हजर असलेल्या भाजप नेत्यांना शेतकऱ्यांनी हकलवून लावलं. भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार देवयानी फरांदे यांना या शेतकऱ्यांनी विरोध केला. या विरोधानंतर हे नेते माघारी फिरले. मात्र हा विरोध शेतकऱ्यांनी नाही, तर राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय असं भाजप नेत्यांनी म्हटलं.

दरम्यान नाशिकमधील संप कायम राहणार असून संपाची दिशा ठरवण्यासाठी उद्या दुपारी 4 वाजता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी उद्या नाशिकमध्ये उपस्थित राहणार असून, उद्या या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांशी चर्चा करणे अपेक्षित होते, मात्र तसे होता हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.