ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

युद्धात शेतकरी जिंकला पण तहात हरला – शरद पवार

मुंबई, दि. ३ - गेल्या दिवसांपासून राज्यात सुरु असलेला संप शेतकऱ्यांनी आज अखेर मागे घेतला. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवल्याचा आरोप माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करताना पवार म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीचा शेतकरी संपामागे हात असल्याचा आरोप करणे म्हणजे पोरकटपणाचे लक्षण आहे.

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी तास चर्चा केली. या बैठकीत ७० टक्के मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेतला. पण, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवले, असा थेट आरोप पवार यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या या संपामागे असल्याचा आरोप म्हणजे पोरकटपणाचे लक्षण असल्याचेही ते म्हणाले. तसेच युद्धात शेतकरी जिंकला पण तहात हरला असे म्हणत पवार यांनी कर्जमाफी केवळ अल्पभूधारकांनाच का ? असा प्रश्नही उपस्थित केला. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती, अशा शब्दात पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.