ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकरी संपाला लोणावळा शहरात कडकडीत बंद पाळून पाठिंबा

लोणावळा, दि. ५ - शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहरात कडकडीत बंद पाळत पाठिंबा देण्यात आला. लोणावळा शहर काँग्रेस कमिटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपाला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा बंदचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला व्यापार्यांनी पाठिंबा देत बंदात सहभाग नोंदविला.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नारायण आंबेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजु बोराटी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आयचे प्रदेश सदस्य दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, नगरसेवक निखिल कविश्वर, सुधिर शिर्के, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुर्वणा अकोलकर, बाळासाहेब कडू, नारायण पाळेकर, बाळासाहेब लोखंडे, जीवन गायकवाड, डाॅ. चिंतामणी, अरुणा लोखंडे, सुनील मोगरे, फिरोज बागवान, शिवराज मावकर, वसंत भांगरे, सुबोध खंडेलवाल, रवींद्र कडू, प्रकाश गवळी, दिपाली गवळी, श्वेता वर्तक, संयोगिता साबळे, ज्ञानेश्वर येवले, संजय थोरवे, राजेश मेहता, दत्तात्रय गोसावी, सनी पाळेकर, गणेश चव्हाण यांनी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमत भाजपा सरकारचा निषेध नोंदवत शेतकर्यांना कर्ज माफी द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा अशी मागणी केली.