ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

...अन मंत्र्याप्रमाणे झेड सेक्यूरीटीत मुंबईला दूध रवाना

मुंबई, दि. ५ - कोल्हापूरवरुन मुंबई शहर परिसरात जाणारे दूध आज पुणे - मुंबई द्रुतगतीमार्गावर चक्क झेड सेक्युरेटीमध्ये रवाना झाले. त्यामुळे उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या होत्या. कारण केवळ व्हियापी लोकांना दिली जाणारी सेक्युरीटी शेतकरी संपामुळे दूध भाज्यांना द्यावी लागत आहे.  यामध्ये कोल्हापूर सांगली परिसरातील गोकुळ वारणा दुधाचे २७ टँकर पोलीस गाड्या इतर पोलिसांच्या ताफ्यात मुंबईकडे रवाना झाले. हे दुध दुपारी दोनपर्यंत मुंबई येथे पोहचणार आहे. शेतकरी इतर संघटनाद्वारे दुध रस्त्यावर ओतले जाऊ नये यासाठी हा पोलिसांचा ताफा गाड्यांसोबत देण्यात आला आहे. 

संपामुळे केवळ भाजीपालाच नाही तर दुधाचेही दुर्भीक्ष शहरपरिसरात जाणवणार आहे. तुर्तास तरी शहरी जनजीवन सुरळीत चालू आहे. मात्र, परिस्थीती अशीच राहिल्यास शहरवासियांना मोठ्या महागाईला तोंड द्यावे लागले. संपूर्ण महाराष्ट्र भर बंद ची हाक देण्यात आली असली तरी या बंदला पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.