ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्विमसूट घालताना तरुणीचं शूट, मुंबईत बिजनेसमनला अटक

मुंबई, दि. ७ - चेंजिंग रुममध्ये स्विमसूट घालताना शुटिंग करणाऱ्या बिजनेसमनला तरुणीने रंगेहाथ पकडलं आहे. मुंबईतील बांद्रा पश्चिम भागातील कपड्याच्या दुकानात आरोपी स्विमसूट चेंज करणाऱ्या तरुणीचं मोबाईलवर शूट करत होता.

उत्तर प्रदेशातील तरुणीच्या तक्रारीनंतर मुंबईतील बोरीवलीत राहणाऱ्या व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘मि़ड डेवृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

जून रोजी तक्रारदार तरुणी बांद्र्यात खरेदीसाठी गेली होती. संबंधित बूटिकमध्ये ती  स्विमिंग कॉश्च्युम पाहत होती, त्यावेळी आरोपी मोविन सार्वालो आपल्याला पाहत असल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ती स्विमसूट ट्राय करण्यासाठी चेंजिंग रुममध्ये गेली.

तितक्यात चेंजिंग रुमच्या पार्टिशनवरुन एक हात मोबाईलने शूटिंग करत असल्याचं तिच्या ध्यानात आलं. तरुणीने आरोपीला रंगेहाथ पकडताच तो बावचळला. त्याने आपण शुटिंग करत असल्याचं नाकारलं, मात्र तिने आरोपीच्या हातून मोबाईल हिसकावला आणि त्यात तिचे फोटो आढळले.

आरोपी मोविन सार्वालोवर कलम ३५४ सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक केली आहे.