ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फडणवीस यांना राजू शेट्टींचे थेट आव्हान

मुंबई, दि. ७ - सत्तेतील सहभागी घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी संपाच्या आड काही राजकीय पक्षांचे नेते हिंसा घडवत असून, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही. त्यांनी आधी माझी कुंडली काढावी, असे ट्विट शेट्टी यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काल पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. आंदोलनात राजकीय कार्यकर्ते घुसले आहेत. ते तोडफोड जाळपोळीचे प्रकार करीत आहेत, शेतकऱ्यांचा संपाला पाठिंबा नाही, शेतकऱ्यांच्या आडून राजकारण सुरू आहे, असे म्हणाले होते. राजू शेट्टी यांनी त्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जर आंदोलनात दम नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर शेतकऱ्यांना सरकार का घाबरले आहे, असा सवाल त्यांनी विचारला होता. शेट्टी यांनी त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही. आधी त्यांनी माझी कुंडली काढावी, असे थेट आव्हानच शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.