ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याची चिठ्ठी

सोलापूर, दि. ८ - मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. धनाजी चंद्रकांत जाधव (वय ४५) असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते करमाळा तालुक्यातील वीट या गावचे रहिवाशी होते. धनाजी जाधव हे शेतकरी संपात सहभागी झाले होते. कर्जबारीपणाला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली.

जाधव यांच्यावर सावकार आणि बँकेचे कर्ज होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्ती लगत असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करु नका, असं या चिठ्ठीत म्हटलं आहे. ही चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली आहे.

दरम्यान, वीट गावातील नागरिकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री राहूदे पण किमान पालकमंत्री तरी आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीनंतर सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे वीट गावाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारीही आहेत.