ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नवी मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नवी. मुंबई, दि. ८ - नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनजवळ एका मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये शरीरविक्रीचा काळाधंदा चालत होता. पोलिसांनी इथून तीन महिलांना अटक केली आहे. याशिवाय तीन मुलींचीही सुटका केली आहे. सुटका केलेल्या मुलींचं वय १६ १९ आणि २५ वर्ष आहे.

१६ वर्षांच्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. तर १९वर्षीय मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला होता. याशिवाय २५ वर्षीय मुलगी विधवा आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहावीची परीक्षा दिलेल्या १६ वर्षांच्या मुलीला तिच्या आईनेच या सेक्स रॅकेटमध्ये ढकललं. तर आपण एका बॉलिवूड दिग्दर्शकाची मुलगी असल्याचं १९ वर्षीय मुलीने सांगितलं.

पोलिसांनी या प्रकरणात शकीला शेख, पुष्पलता आणि मार्गेटला या तिघींनी अटक केली आहे. या तिघींनी वाशीमध्ये घर भाड्याने घेतलं होते. तिथूनच ह्या शरीरविक्रीचा धंदा करत होत्या. या तिघी दलालांच्या माध्यमातून ग्राहकांना शोधत असत. पोलिसांना काही दिवसांपूर्वीच या सेक्स रॅकेटची कुणकुण लागली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केलं.