ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकरी संप देशस्तरावर नेणार - खा. राजू शेट्टी

नाशिक, दि. ८ - शेतकरी संप आंदोलन आता राज्यातच नाही तर देशस्तरावर न्यायचं आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ते नाशिकमध्ये सुकाणू समितीच्या बैठकीला आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलन आता देशव्यापी करायचं आहे. देशातल्या इतर राज्यांचा दौरा सुरू करणार आहे. स्वामिनाथन आयोगाच्या सूचना लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणून, शेतकऱ्यांसाठी त्यांचीही मदत घेणार. याशिवाय सत्तेतले बदलले मात्र आम्ही तिथेच जनतेच्या सोबत आहोत. सत्तेत राहण्याचा सस्पेन्स लवकरच फोडणार आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदे पंडित आहेत, मात्र त्यांना त्यांचीच जुनी भाषण पाठवतो.

पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी नाशिकमधील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची आज बैठक होणार आहे.

शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी नव्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

या समितीमध्ये राजू शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह २१ जणांची नावं आहेत.