ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रमजान निमित्त व्होडाफोन देणार ५ रुपयात अनलिमिटेड डेटा

मुंबई, दि. ८ - रमजानच्या निमित्ताने टेलिकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने खास ऑफरची घोषणा केली असून व्होडाफोनने पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील स्थानिकांना अनलिमिटेड शेअरिंग, अनलिमिटेड केअरिंग या ऑफरसोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगसोबत फ्री डेटा मिळवण्याची संधी दिली आहे.

मंगळवारी आपल्या या नव्या रमजान स्पेशल नव्या ऑफरची घोषणा व्होडाफोनने केली आहे. यामध्ये 2G वापरकर्ते *444*5# डायल करुन रुपयात अनलिमिटेड डाटा ऑफर मिळवू शकतात. तर 3G वापरकर्ते *444*19# डायल करुन १९ रुपयात अनलिमिटेड डाटा ऑफरचा फायदा घेऊ शकतात. अनलिमिटेड डाटाशिवाय 2G वापरकर्ते 253 रुपयात अनलिमिटेड पॅकसोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचाही लाभ घेऊ शकतात.

२४५ रुपयात युजर्स अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलसोबत १जीबी डेटाही मिळवू शकतात. तसेच लोकल आणि एसटीडी कॉलसाठी फक्त ३० पैसे प्रती मिनिट मोजावे लागतील. ही ऑफर ९० दिवसांसाठी लागू असेल. आमच्यासाठी रमजानचा पवित्र महिना खूप खास असून आम्ही यासाठी आमच्या युजर्सला लक्षात ठेवत हे पैसा वसूल पॅकेज आणले आहे. युजर्स आपले कुटुंब आणि मित्रांसोबत नव्या डाटा आणि कॉलिंग पॅक्ससोबत जोडले जातील. तसेच माफक दरात इंटरनेटचा फायदाही मिळेल.