ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बच्चू कडूंना दहशतवादी घोषित करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई, दि. ९ - मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचं वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केला नाहीत तर भगतसिंहांनी ज्या पद्धतीनं संसदेवर बॉम्ब हल्ला केला होता. तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकू असं आमदार बच्चू कडू म्हणाले होते. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट बच्चू कडू यांना दहशतवादीच घोषित करण्याची मागणी केली आहे.

इतकंच नाही तर अमरावतीत थोड्याच वेळात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असून बच्चू कडूंना अटक करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना बच्चू कडू म्हणाले, बॉम्ब फेकणार याचा अर्थ खरोखर बॉम्ब फेकणार असं नाही. हा शेतकऱ्यांबाबतचा आक्रोश आहे. बॉम्ब फेकलाच तर त्याने कोणालाही इजा होणार नाही, तो फक्त आवाज करणारा सुतळी बॉम्ब असेल. शेतकऱ्यांसाठी आतंकवादी घोषित करू देत, पण बॉम्ब टाकताना मुख्यमंत्र्यांच्या शर्टलाही धक्का लागणार नाही हा आवाजापुरता असेल. याशिवाय सध्याचं चित्र काँग्रेस सरकारप्रमाणंच आहेकाँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या जात होत्या, भाजपाही तेच करतंय.

ही लढाई देश पातळीवर न्यायची आहे. मोदी ज्या भागातून आहेत त्या गुजरातेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेतआंदोलनात शेतकरी नाही असं म्हणणं हे मुख्यमंत्रांचं नाही तर सरपंचाचं वक्तव्य वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.