ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदेंना लाच घेताना अटक

सातारा, दि. ९ - वाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना लाच घेतना अटक करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून लाच घेताना नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे यांना अटक झाली. शिंदे यांच्यासह त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आलं आहे. प्रतिभा शिंदे या भाजपकडून निवडून आल्या आहेत. यंदा नागरिकांमधून नगराध्यक्षांची निवड झाली आहे. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्षांनीही लाच घेऊन, पद आणि प्रतिष्ठेला काळिमा फासला आहे.

नगराध्यक्ष बाईंनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे १४ हजाराची लाच मागिल्याचा आरोप आहे. याच लाचेची रक्कम स्वीकारताना प्रतिभा शिंदे आणि त्यांच्या पतीला अटक झाली आहे. या घटनेमुळे साताऱ्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.