ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे-मुंबई महामार्गावर ३४ लाखांचा विमल गुटखा जप्त, तिघे ताब्यात

वडगाव मावळ, दि. ९ - पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर वडगाव मावळ पोलिसांनी कारवाई करत ३४ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारावाई आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता करण्यात आली. यामध्ये तीन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गाडी मालक श्रीकांत बाळासाहेब चांदेकर (वय २८ रा. वडगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव पोलिसांना गुटखा पुण्याकडे रवाना होणार असल्याची बातमी मिळाली त्यानुसार सापळा रचत पुणे-मुंबई महामार्गावर पुण्याकडे येणारा एमएच १२ सीएन ४४९९, एमएच १२ ईडी ९३६५ एमएच १२ एसडी ३४४१ या एक आयशर टेम्पो दोन छोटे टेम्पो अशा तीन गाड्यांमधून गुटख्याची वाहतूक केली जात होती. यावेळी पोलिसांनी तिन्ही गाड्यातून  ३४ लाख २० हजार रुपयांचा २०० पोत्यातील गुटखा जप्त केला. यामध्ये गाडीच्या तिन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अवैध गुटखा विक्रीस नेल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.