ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

...तर मी सुकाणू समितीतून बाहेर पडेन - राजू शेट्टी

मुंबई, दि. १० - सुकाणू समितीच्या नाशिकमधील बैठकीचा सूर पाहता, मी आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, असंच सर्वांचं म्हणणं होतं. पण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मी तयारी दाखवली. मात्र, अजूनही काहींना आक्षेप असेल, तर मी बाहेर पडायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका सुकाणू समितीचे सदस्य खासदार राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली. शिवाय, तसंही मला या सरकारशी काही देणं-घेणं नाही. मी माझं सरकारविरोधातलं आंदोलन लढतो आहे, असेही ते म्हणाले.

सरकारला आम्ही दोन दिवसांचा अवधी दिला होता. अन्यथा आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशाराही दिला होता, असे राजू शेट्टींनी सांगितले. त्याचसोबत, “सरकारकडून निमंत्रण आल्याचं मला माहिती नाही. शनिवारी सुकाणू समितीची बैठक आणि रविवारी सरकारसोबत बैठक आहे. त्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडू. मात्र, त्याआधी समितीतल्या काही लोकांनी घाई गडबडीत भूमिका मांडणं चुकीचं आहे.”, असेही ते म्हणाले.

माझ्याकडे सूत्र आणि अजित नवलेंकडे समन्वयक पदाची दबाबदारी दिली आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा. मात्र, तरीही इतरांना जर चर्चेला जायचंच असेल, तर मी माझं नाव मागे घ्यायला तयार आहे.”, असेही राजू शेट्टींनी सांगितले.

आधी बैठकीत मी सगळ्यांची मतं जाणून घेऊन मगच मी माझं समन्वयाबद्दलच्या मतभेदावर मत मांडेन. तरी मी राजकीय पक्षाचा आहे म्हणून जर यांचा मला विरोध असेल तर एक लक्षात घ्या की मला या सरकारशी काही देणं-घेणं नाही. मी माझं सरकारविरोधातलं आंदोलन लढतो आहे.”, असेही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.