ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

तब्बल ११ दिवसांनी लासलगाव बाजारपेठ सुरु होणार

नाशिक, दि. १२ - शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे गेल्या ११ दिवसांपासून शुकशुकाट पसरलेल्या लासलगाव बाजारसमितीमधील कारभार आजपासून पूर्वपदावर येणार आहे. गेल्या ११ दिवसांपासून लासलगाव बाजारसमिती बंद असल्यानं शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचही मोठं नुकसान झालं. दरम्यान आजपासून लासलगाव बाजारसमितीत पुन्हा एकदा कांदा आणि धान्याचा लिलाव सुरु होणार आहे. त्यामुळे आता हळू-हळू बाजार समित्यांमधील कारभार पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काल रविवारी सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली. कर्जमाफीसाठी २६ जुलैचं अल्टिमेटम सरकारला देण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन तुर्तास थांबवलं आहे.

शेतकरी संपामुळे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजार समिती असलेली लासलगाव बाजार समिती ओस पडली होती. दररोज होणारी हजारो क्विंटल कांद्याची आवक आणि करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. एकट्या नाशिक जिल्ह्यात संपामुळे १०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल थांबली होती. शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांची रोजंदारी या काळात बुडाली. जिल्ह्यातल्या १७ मोठ्या बाजार समित्या आणि २० उपबाजार समित्यांमध्ये रोज होणारा २० ते २५ कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प झाला होता.