ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कर्जमाफीसाठी केंद्राकडून मिळणार नाही दमडी – जेटली

मुंबई, दि. १२ - राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला फडणवीस सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. पण तिकडे केंद्र सरकारने हात वर केले आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी तयार असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांनी स्वत: निधी उभारायला हवा, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.

जेटली म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्या राज्यांना करायची आहे, त्यांना आपले उत्पन्नाचे स्त्रोत स्वत: शोधावे लागतील. दरम्यान, जेटलींनी हात वर केल्यानंतर राज्य सरकारची बाजू घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया घेतली. चंद्रकातं पाटील म्हणाले, केंद्र सरकारने आधीच कर्जमाफीसाठी मदत देणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे आम्ही आमची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील कर्जमाफीसाठी राज्य सरकार निधी उभारेल. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आता राज्य सरकारने उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीआधी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.