ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबईत मॉडेलची राहत्या घरी हत्या

मुंबई, दि. १३ - मुंबईच्या अंधेरीमध्ये एका स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या झाली. कृतिका चौधरी असं खून झालेल्या मॉडेलचं नाव आहे. अंधेरीतल्या चार बंगला परिसरात असलेल्या भैरवनाथ सोसायटीतील घरात कुजलेल्या अवस्थेत कृतिकाचा मृतदेह सापडला. कृतिकाच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर या हत्येची घटना उघडकीस आली.

पोलिस घटनास्थळी पोहोचले असता घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. मृतदेहाच्या अवस्थेवरुन ते दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी तिची मृतदेह बाहेर काढला असता, तिच्या डोक्यावर जखमा होत्या आणि पूर्णत: सडलेला होता

दरम्यान, पोलिसांनी कृतिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. अंबोली पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोस्टमॉर्टेम  रिपोर्ट आल्यानंतर पोलिस पुढील तपास करणार आहेत. कृतिका मूळची हरिद्वारची असून ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी ती मुंबईत आली होती. कृतिकाला पहिला ब्रेकपरिचयमालिकेतून मिळाला होता. याशिवाय कंगना राणावतच्यारज्जोसिनेमातही ती दिसली होती.