ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तुमच्या पापात आम्ही वाटेकरी नाही - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १३ - शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्राण जर तुम्ही असेच घेणार असाल तर आमचे तुमच्याशी जमणार नाही तुमच्या पापात आम्हाला वाटेकरी व्हायचे नाही ही आमची रोखठोक भूमिका आहे आणि राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सांगितले आहे. आमचा या सरकारला तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न सोडवता फक्त राजकीय फायद्या तोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर आम्हालाहीहमीभावाचे सांगता येत नाही. आज शेतकरी आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्याच्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतःदिवाळीचा अर्थ आहे!

शिवसेनेचा शेतकरी आंदोलनात संपूर्ण सहभाग होता. आंदोलन त्यामुळे तीव्र झाले ते इतके तीव्र झाले की, जणू सरकारचा गळाच आवळला गेला. शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी एकतर सरसकट कर्जमाफी करा नाहीतर गुदमरून मरा हाच शिवसेनेचा संदेश आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीच्या प्रश्नावरकॅबिनेटवर बहिष्कार टाकून हाच इशारा दिला होता असे शिवसनेने सांगितले आहे.

शिवसेनेने सरकारात राहून रोज याप्रश्नी लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. शिवसेना सरकारमध्ये का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. फक्त खुर्च्या उबवायला शिवसेना सरकारमध्ये बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे. अर्थात उद्याचीहमीकाही आम्ही देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस तत्त्वतः वगैरे मान्यता दिली तशी तत्त्वतः स्थगिती समृद्धी महामार्गास दिली असती तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन तोफांच्या सलामीने केले असते. मुख्यमंत्र्यांनी ती संधी राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने द्यावी अशी आम्ही त्यांनातत्त्वतःविनंती करीत आहोत.

तत्त्वतःशब्दाच्या रेशमी फासात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी अडकून पडू नये. नाहीतर विश्वासघात उपेक्षेच्या भडक्यात सरकार होरपळून निघेल. सरकारने तत्त्वतः कर्जमाफीचे निकष तत्काळ जाहीर करावेत. फडणवीस सरकारच्या काळात ज्या चार एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या Posted On: 13 June 2017