ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… तर जुलैनंतर शिवसेना करणार मोठे आंदोलन – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १४ - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून धारेवर धरले आहे. योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी झाल्यास शिवसेना सत्तेची पर्वा करणार नसल्याचा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे. जुलैपर्यंतचा वेळ सरकारकडे आहे. त्यानंतर सरकारविरोधात मोठी कारवाई केली जाईल त्यासाठी तयार राहावे असे देखील उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंची पहिल्यांदा संपाची ठिणगी पेटवणाऱ्या शेतकऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. सरकार दिलेल्या हमीला जागेल त्यामुळे यापुढे लढण्याची वेळ येऊ नये आणि तशी वेळ जर आली तर शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. सरकारची भाषा मला कळत नाही, शेतकऱ्यांचा सातबारा मला कोरा करुन हवा आहे, अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

संपाला शिवसेनेने उघड पाठिंबा दिल्यामुळे शेतकऱ्यांचा संप यशस्वी झाला असा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. दरम्यान, चंद्रकांत पाटील उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या भेटीदरम्यान ते उद्धव ठाकरेंचे कर्जमाफीसंदर्भातील शंकांचे निरसन करणार असल्याचे समजते आहे.