ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सत्तेसाठी मोदींनी दिली खोटी आश्वासने, हिंदू अधिवेशनात नाराजीचा सूर

फोंडा, दि. १५ (वृत्तसंस्था) - कट्टर हिंदुत्ववादी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा असली तरी त्यांच्याविरोधात आता हिंदूत्ववादी संघटनांमध्येही नाराजी पसरली आहे. कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी मोदींच्या कारभारावर गोव्यात सुरु असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात नाराजी व्यक्त केली. हिंदूंना मोदींनी फसवलेच अशी भावना अधिवेशनात व्यक्त करण्यात आली.

सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन गोव्यातील पोंडा येथे सुरु असून विविध संघटनांच्या नेत्यांनी या अधिवेशनातील चर्चासत्रामध्ये मोदी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. याबाबतचे वृत्तइंडिया टुडेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सत्तेवर येण्यासाठी मोदींनी खोटी आश्वासने दिल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली. मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले. पण राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न झाले नाही. त्यांना यावरुन फक्त सत्तेची लालसा असल्याचे दिसते. हिंदू राष्ट्र त्यांना नकोच आहे. देशातील हिंदूंची फसवणूक झाली आहे असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितले.

मोदी सरकार जम्मू काश्मीरमधील तिढा, काश्मीर पंडितांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर तोडगा काढेल अशी हिंदुत्ववादी संघटनांना आशा होती. पण जम्मूत पीडीपीसोबत भाजपने युती केली आणि तिथेही भाजपला फक्त सत्ताच हवी असल्याचे दिसते असे हिंदूत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. आमचे सरकार केंद्रात असल्याचे वाटत नाही. राम मंदिराचे काम सुरु झाले असते तर भारताला हिंदूराष्ट्र म्हणता आले असते. हिंदू राष्ट्रांमध्ये अन्य धर्मांना स्थान नाही. आमच्यासाठी हिंदू धर्मच महत्त्वाचा आहे असे साध्वी सरस्वती यांनी सांगितले.

फोंडा येथ हिंदू अधिवेशन सुरु असून पुढील दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. भारतासह २१ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील १५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशात हजर राहणार आहे. मंदिररक्षण, गोरक्षण, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर या समस्यांसह काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे.