ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भावाला लाखो रुपयांची कर्जमाफी देणारा तो माजी मंत्री कोण

मुंबई, दि. १५ - कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर या योजनेचा लाभ धनदांडग्यांना होऊ नये, यासाठी सरकारने कंबर कसली आहे. शेतकरी नेते, सरकारचे प्रतिनिधी आणि सर्वपक्षीय मिळून कर्जमाफीसाठी निकष काय असावेत, याचा निर्णय घेणार आहेत.

राज्यात यापूर्वी २००८ साली राज्यासह देशभरात ऐतिहासिक ७२ हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे ८२-८२ लाखांपर्यंतचं कर्ज माफ झालं. राज्यातील मंत्रिमंडळात एका टॉपच्या मंत्र्याने स्वतःच्या भावाला कर्जमाफी मिळवून दिली, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर तो मंत्री कोण, अशी एकच चर्चा राज्यभर सुरु झाली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कर्जमाफी ही खैरात होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनेचे नेतेच स्वतःहून बैठकीत बोलले. ज्यांना आवश्यक आहे, अशापर्यंतच कर्जमाफी पोहोचावी. २००८ साली पश्चिम महाराष्ट्रात ८२-८२ लाख कर्जमाफ झाले, नाव घेऊन कुणाला एक्स्पोज करणं माझा स्वभाव नाही, पण त्यावेळी महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये टॉप मिनिस्टर असणाऱ्याच्या सख्ख्या भावाला कर्जमाफी मिळाली. अशी कर्जमाफी होणार असेल, तर १०० रुपये आपल्याकडे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अनेकांना समाधानी करायचं असेल तर ज्याला गरज नाही, ते रांगेतून बाहेर पडले, तर गरज असणारा आपोआप पुढे येईल