ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांचे कंबरडे नोटाबंदीमुळेच मोडले – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १६ - काळा पैसा वगैरे नोटाबंदीमुळे बाहेर येणार होता पण तो आला नाहीच. उलट हातावर पोट असलेल्या शेतक-यांचे कंबरडे मोडले. शेतक-यांचे अर्थकारण विस्कटून टाकणारानोटाबंदीचा निर्णय होता. त्या बिघाडीतून शेतकरी अद्याप सावरलेला नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. शेतकरी बांधवांना नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका बसला तो नव्या कर्जाच्या ओझ्याखाली भरडला गेला. केंद्र सरकारच यास जबाबदार असल्याने आता देशभरातील शेतक-यांच्या कर्जाचा भार केंद्रानेच कमी करावा अशा ममता बॅनर्जींच्या भुमिकेला उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे.

बाजारातनोटाबंदीमुळे पैसेच नसल्याच्या सबबीखाली या लाखो शेतमजुरांनादेखील त्यांची हक्काची मजुरी मिळू शकलेली नाही हे वास्तव असून शेतकरी बांधवांना नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका बसला तो नव्या कर्जाच्या ओझ्याखाली भरडला गेला. केंद्र सरकारच यास जबाबदार असल्याने आता देशभरातील शेतक-यांच्या कर्जाचा भार केंद्रानेच कमी करावा, अशी डरकाळी बंगालच्या वाघिणीने फोडली असेल तर ती योग्यच असल्याचे मत उद्धव ठाकरे मांडले आहे. संपूर्ण देशाची आर्थिक शिस्त बिघडवणारा शेतक-यांचे अर्थकारण विस्कटून टाकणारानोटाबंदीचा निर्णय हाच मुळात होता. त्या बिघाडीतून अद्याप शेतकरी सावरलेला नसल्याचेही ते म्हणाले.

नोटाबंदीच्या काळात चलन तुटवडा झाल्याने रोखीचे व्यवहार बंद पडले. शेतक-याच्या मालास भाव तर नव्हताच, पण उठावही नव्हता. शेतक-यांनी त्यामुळे सर्व माल दलाल अडत्यांना उधारीवर दिला. त्याची वसुली अद्याप झालेली नाही. महाराष्ट्रातील शेतकरी कापूस, फळे, भाज्या वगैरे घेऊन बाजूच्या राज्यात गेले तेथील मोठय़ा व्यापा-यांनीआता नोटाबंदीमुळे पैशांचा तुटवडा आहे. येतील तसे पैसे देऊ, अशी थूकपट्टी गरीब शेतक-यांना लावली. महाराष्ट्रातील शेतक-यांचे असे कोटयावधी रुपये हडपले गेल्याचा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

त्यांना मध्यावधी निवडणुका हा खेळ वाटत असेल तर तो त्यांनी अवश्य खेळावा, पण स्वतःचा राजकीय कंडू शमविण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर