ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पानसरे यांची हत्या करण्यासाठी चौघे उपस्थित होते - निंबाळकर

कोल्हापूर, दि. १६ - गोविंदराव पानसरे हत्या झाली त्यावेळी घटनास्थळी दोघे नाही तर चौघे उपस्थित असल्याची माहिती विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात दिली आहे.

प्रत्यक्षदर्शीने यावेळी आरोपी समीर गायकवाडलाही ओळखले असून पानसरे यांची हत्या करण्यासाठी चौघे उपस्थित होते. त्यामध्ये समीर गायकवाडही उपस्थित होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येच्या वेळी वेगवेगळे रिव्हॉल्व्हर वापरले होते, असा अहमदाबाद बॅलेस्टीकचा रिपोर्ट आहे. कोल्हापूऱ जिल्हा सत्र न्यायालयात या संदर्भात सुनावणी सुरू असून समीर गायकवाड हा हत्येच्या कटात आणि प्रत्यक्ष हत्येत सहभागी होता असे न्यायालयात सांगण्यात आले आहे.

या खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याला जामीन दिला तर साक्षीदारांवर दबाव आणला जाईल, असे म्हणत सरकारी वकिलांनी गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही, अॅड. पुणाळेकर यांनी या प्रकरणातील साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे समीर गायकवाड याला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे.