ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

तो शिवसैनिक नाही, शिवसेनेने हात झटकले

मुंबई, दि. १७ - संदीप कदम शिवसैनिक नाही. शिवसेनेने त्याची कोणतीही फसवणूक केलेली नाही, असं सांगत शिवसेनेने हात झटकले आहेत. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी पक्षाने तब्बल ३ लाखाचं बिल थकवल्याने उपासमारीची वेळ आल्याचा आरोप संदीप कदम यांनी केला आहे. मात्र संदीप कदम यांचा आरोप चुकीचा असून शिवसेनेशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही, असंही पक्षाने स्पष्ट केलं आहे.

संदीप कदम शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीच, पण त्यांचा अंबरनाथमधील शिवसेनेशीही संबंध नाही. संदीप कदम असे आरोप करुन पक्षाला, माजी नगाध्यक्ष सुनील चौधरी आणि आमदार बालाजी किणीकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे २०१४ साली अंबरनाथ दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कमानी आणि झेंडे लावून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. याचं काम स्थानिक शिवसेना शाखेने संदीप कदम यांना दिलं होतं. पण दौरा झाल्यानंतर, याचं तब्बल तीन लाखांचं बिल पक्षाने थकवल्याने संदीप यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे.

यातच बिलासाठी चकरा मारताना संदीपला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळं मागील वर्षभरापासून तो अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळं तीन मुलींच्या पालनपोषण, शिक्षणासह घरखर्च भागवण्यासाठी संदीपच्या पत्नीला घरकाम करण्याची वेळ आली आहे.

संदीप कदमने आतापर्यंत पालिका अधिकाऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे उकळले आहेत. त्याला जुगाराचं व्यसन असून त्याने पैसे उडवले आहे. आजाराची सहानुभूती मिळवण्यासाठी संदीप सोशल मीडियावर अफवा पसरवत आहे. मदतीसाठी त्याने स्वतःचा नंबरही दिला असून त्याला अनेक ठिकाणांहून आर्थिक मदतही मिळत आहे, असा आरोप शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केला आहे.