ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… अन् जेट एअरवेजने दिली बाळाला मोफत विमानसेवा

मुंबई, दि. १९ - जेट एअरवेजच्या विमानात एका प्रवासी महिलेने मुलाला जन्म दिला आहे. सौदी अरेबियातील दमामहून कोचीला जाणाऱ्या विमानात बाळाचा जन्म झाला. मुलाची प्रकृती चांगली असून जेट एअरवेजने बाळाला आजन्म मोफत विमान प्रवास देण्याची घोषणा केली आहे.
विमान प्रवास सुरू असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका गर्भवतीला प्रीमॅच्युर प्रसुतीकळा येऊ लागल्या. त्यावेळी विमान अरबी समुद्रावर ३५ हजार फुटांवरुन प्रवास करत होते. विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने विमान जवळ असलेल्या मुंबई विमानतळाकडे वळवले. महिलेला प्रसुतीकळा सुरू होताच कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. दमाम-कोची ९ डब्ल्यु ५६९ या विमानात १६२ प्रवासी होते, मात्र डॉक्टर नव्हता. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या केरळमधील एका नर्स आणि इतर महिलांच्या मदतीने या महिलेची प्रसुती पार पडली. 

या महिलेने विमानातच गोंडस बाळाला जन्म दिला. मुंबई विमानतळावरुन उतरताच बाळ-बाळंतीणीला रुग्णालयात रवाना करण्यात आले. अंधेरीतील हॉली स्पीरिट हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. जेट एअरवेजच्या विमानात जन्माला आलेले पहिलेच बाळ असल्यामुळे कंपनीने त्याला जेट एअरवेजच्या कोणत्याही विमानाने आजन्म मोफत प्रवास करू देण्याची घोषणा केली आहे.