ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मुंबई साखळी स्फोट, दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद

मुंबई, दि. १९ - १९९३ मुंबई साखळी स्फोटातील दोषींच्या शिक्षेसंदर्भात आजपासून युक्तीवादाला सुरुवात होणार आहे. टाडा विशेष न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्ला शेख या सहा जणांना दोषी ठरवलं. तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या सर्वांवर हत्या, कट रचणे आणि टाडा कायद्याअंतर्गत गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे आज युक्तीवादाच्या पहिल्याच दिवशी काय घडामोडी घडत आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या प्रकरणात टाडा कोर्टाने आधीच १०० आरोपींना दोषी ठरवलं आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशीही देण्यात आली. खटल्यादरम्यान, मुंबई पोलिस आणि भारत सरकारने अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला पुर्तगालहून आणि मुस्तफा डोसाला दुबईहून प्रत्यार्पण करुन भारतात आणलं होतं. अबू सालेमला फाशी दिली जाणार नाही, याच अटीवर त्याचं पोर्तुगालने त्याला भारताकडे सुपुर्द केलं होतं.

पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठी अबू सालेमने गुजरातहून मुंबईत आणला. यापैकीच शस्त्र त्याने अभिनेता संजय दत्तला दिले होते. मुस्तफा डोसाने स्फोटांसाठी पाकिस्तानातून आलेले आरडीएक्स मुंबईला आणले. बॉम्बस्फोटासंदर्भात दुबईत झालेल्या पहिल्या बैठकीला तो उपस्थित होता. आरडीएक्सने भरलेली मारुती व्हॅन गुजरातच्या भरुचमध्ये अबू सालेमकडे सोपवल्याचा आरोप रियाज सिद्दीकीवर आहे.

फिरोज खान आणि करीमुल्ला शेखवर स्फोटाचं सामान पोहोचवण्याचा आरोप आहे. तर मोहम्मद ताहिर मर्चंटवर स्फोटात सहभागी आरोपींना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे. तसंच अब्दुल कय्यूमवरही संजय दत्तला शस्त्र दिल्याचा आरोप आहे.