ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राज्यातील ३ टोलनाक्यांवर २९ वर्ष सुरु राहणार वसुली

मुंबई, दि. २० - राज्यातील नागरिकांना टोलपासून मुक्ती हवी असताना नागरिकांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. राज्य सरकारने नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी टोलनाक्यांवर वसुलीचा कार्यकाळ वाढवला आहे. यात तीन टोलनाक्यांचा समावेश आहे. वांद्रे-वरळी सी लिंक, वाशी आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हे ते टोलनाके आहेत. सरकारच्या नव्या निर्णयानुसार या टोलनाक्यावर पुढील तब्बल २९ वर्षे टोलवसुली सुरुच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर आणखी अधिक काळ भार पडणार आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वॄत्तानुसार, वांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या कामासाठी, वांद्रे-वरळी सी लिंकचा टोल २०६८ पर्यंत खुला राहणार आहे. खाडीवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी वाशी टोलनाक्यावर २०३८ पर्यंत तर लोणावळा-खंडाळा भुयारी मार्गाच्या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुली २०४५ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रकल्पांचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यास टोलवसुली सुरु होईल.

याशिवाय मुंब्रा बायपास (शिळफाटा) ते कल्याणपासून नाशिक महामार्गापर्यंतच्या ३० किमी रस्त्याच्या सहा पदरीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना २०१६ मध्ये बंद केलेल्या टोलनाक्यांवरही टोल द्यावे लागणार आहे. १६ किमीच्या टनेल एक्स्प्रेस बायपाससाठी ४८०० कोटी रुपये, १२ पदरी वाशी खाडीवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी ७७७ कोटी रुपये आणि वांद्रे-वर्सोवा सी लिंकसाठी ७५०२ रुपये खर्च अपेक्षित आहे. पायाभूत सुविधांसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीने एमएसआरडीला अतिरिक्त टोल वसुलीची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपसमितीचे प्रमुख आहेत.