ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आगमनाआधीच लालबागच्या राजाचा यंदाचा फोटो व्हायरल

मुंबई, दि. २१ - गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पावसाला सुरूवात होताच बघायला मिळते. अवघ्या काही दिवसांवरच सर्वांच्या लाडक्या विघ्नहर्त्याचा हा उत्सव येऊन ठेपला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध लालबागच्या राजाची मूर्ती कशी असेल, याची उत्सुकता गणेशभक्तांना लागली आहे. अशातच लालबागच्या राजाचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोतील ही यावर्षीची मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे.

गणरायाचे आगमन २५ ऑगस्ट २०१७ रोजी होणार आहे. राज्यासह देशभरात मूर्तिकार गणेश मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. तर गणेशभक्तांचे उत्सवाचे प्लॅनिंग सुरू आहे. आपापल्या घरातील गणेशाच्या मूर्तीसोबतच नवसाल पावणा-या लालबागच्या राजाची मनोहारी मूर्ती कशी असेल याची उत्सुकता गणेशभक्तांमध्ये असते. दरवर्षी लालबागचा राजाबद्दल गणेश मंडळ आणि गणेश मूर्तीकार कमालीची गुप्तता पाळतात. पण यंदा सोशल मीडियावर लालबागच्या राजाचा एक फोटो व्हायरल होत असून, हा फोटो २०१७च्या लालबागच्या राजाचा असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षीप्रमाणे या गणेश मूर्तीच्या प्रभावळीत बदल असल्याचे दिसत आहे. यंदाची लालबागच्या राजाची प्रभावळ Posted On: 21 June 2017