ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महापालिकेच्या कर्जरोख्यांचा मुंबई शेअर बाजारात नोंदणी कार्यक्रम

मुंबई, दि. २२ - शहरात २४ तास समान पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या कर्जरोख्यांची आज सकाळी वाजता मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. भव्य कार्यक्रमाचे आयोजन मुंबई शेअर बाजारात करण्यात आले आहे. २००७ नंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली असून याबद्दल केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी अभिनंदन केले आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जून मेघवाल उपस्थित होते. तसेच महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची ही उपस्थिती होती.  

पुणे महापालिकेच्या २४x पाणी पुरवठा योजनेसाठी हजार २६४ कोंटीचे कर्जरोखे पुढील पाच वर्षात उभारण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्यातील २०० कोटीचे कर्जरोखे स्वरुपातील पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे

पुणे महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी राज्य आणि केंद्र सरकारने निधी देण्यासाठी असमर्थता दर्शवल्यामुळे या प्रकल्पासाठी हजार २६४ कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला असून कर्ज रोखे उभारण्याची प्रक्रिया करण्यात येत येत आहे. पुढील पाच वर्षात हे कर्ज रोखे उभारण्यात येणार आहे. महापालिकेला कर्ज रोखे तयार करण्यासाठी २१ कंपन्यांनी तयारी दर्शवली होती. त्यातील कंपन्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येकी १०० कोटी प्रमाणे उद्या महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी जमा होणार आहेत. यामुळे 24 तास पाणी पुरवठा योजनेला चालना मिळणार आहे.