ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एक्सप्रेस वेवर अवजड वाहनांसाठी फेक्झिबल हाईट बँरियर

मुंबई, दि. २३ - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांना लेनची शिस्त लावण्यासाठी अपघात तसेच वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीच्या वतीने फेक्झिबल हाईट बॅरिअर लावण्यात येणार आहेत. हे बॅरिअर  किमी ३३ ते ५२ दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणार्या मार्गावर खालापूर टोलनाका ते लोणावळ्यातील तुंगार्लि गावच्या हद्दीत पर्यंत बसविण्यात येणार अाहेत.

या संकल्पनेचे उदघाटन महामार्गाचे अप्पर पोलीस महानिरीक्षक आर. के. पद्मनाभन यांचे हस्ते करण्यात आले आहे. यावेळी रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत औटी,  पत्की, आयआरबीचे कर्नल जोशवा, रायगड विभागाचे महामार्ग पोलीस अधिक्षक विजय पाटील, पुणे विभागाचे महामार्गाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, महामार्गाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली अंबुरे, पोलीस निरीक्षक डी. जी. गाढवे यांच्यासह पळस्पे, बोरघाट (दस्तुरी), खंडाळा व वडगाव महामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मागील  १२ वर्षापासून झालेल्या हजारो अपघातात हजारो प्रवाशांना प्राणांना मुकावे लागले असून अनेक जण जायबंद झाले आहेत. या अपघातांमागे ओव्हरस्पीड, लेनची बेशिस्त, चुकीचे ओव्हरटेक करणे या प्रमुख कारणांसह इतर कारणे आहे. मागील ते वर्षांपासून एक्सप्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सह रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलीस यंत्रणेने विविध उपाययोजना संकल्पना राबविल्या आहेत. मात्र त्या सर्व कुचकामी ठरल्या असल्या तरी यामुळे काही प्रमाणात अपघातांवर अंकुश राहिल्याने अपघातांच्या संख्येत घट झाली आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे दुर्दैवाने या मार्गाला मृत्यूंचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे.

या मार्गाची हि ओळख नाहीशी करण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलीस यंत्रणेने कंबर कसत विविध उपाययोजना प्रयोग राबविले आहे. त्यापैकी आता लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांना लेनची शिस्त लावण्यासाठी एक्सप्रेस वेवरील पहिल्या लेनवर हाईट बॅरिअर बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. खोपोली ते लोणावळा दरम्यान ५६ ठिकाणी हे बँरिअर लावण्यात येणार अाहेत.