ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई, दि. २३ - कोकणासह, विदर्भ, मराठवाड्यात आज aजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं जरा उसंत घेतली आहे. अरबी समुद्रातंलं वातावरण अनुकूल नसल्यानं कमी दाबाचा पट्टा पुढे सरकण्यात अडचणी येत आहेत. जूनच्या सुरुवातील पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे

कोल्हापुरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण सध्या तिथंही पाऊस म्हणावा तसा बरसत नाही. जून महिन्यात इथं सरासरी ३३७ मीमी पाऊस पडतो पण आतापर्यंत फक्त ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त १६ टक्के पेरणी झाली आहे. ज्यांनी पेरणी केली ते शेतकरी आता पावसाची अतुरतेनं वाट बघत आहेत

तिकडे चंद्रपुरातही अशीच स्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अत्यल्प पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडेल या आशेनं कापूस आणि सोयाबीन यांची पेरणी केली होती ते आता चांगलेच संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरावा अशीच सर्वांची इच्छा आहे.