ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रपती म्हणजे निव्वळ रबर स्टॅम्प - राज ठाकरे

मुंबई, दि. २४ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपती फक्त रबर स्टॅप आहे, त्यांचा देशाला कधीच फायदा झाला नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी हे वक्तव्य राष्ट्रपती निवडीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले आहे.

राष्ट्रपतींना देशातील नागरिक पत्र लिहतात, पण त्यांना त्याचे उत्तर कधीच मिळत नाही, मग राष्ट्रपती गोविंद झाले किंवा गोपाळ झाले त्याचा आम्हाला काय उपयोग? असेही राज ठाकरे म्हणाले. आतापर्यंत राष्ट्रपतींचा उपयोग फक्त याकूब मेमनच्या फाशीच्या वेळी झाला. या देशात आज इतके विषय आहेत. जी दडपशाही सरकारकडून चालू आहे त्याबाबत राष्ट्रपतींना मोठ्या प्रमाणात देशभरातून नागरिक पत्र, मेल पाठवतात. त्यांना कुठची उत्तरे मिळतात का? आणि पूर्वीपासून राष्ट्रपती पदासाठी जो शब्द वापरला जातो. तो म्हणजे रबर स्टॅम्प. ज्याचे सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती, असे राज ठाकरे म्हणाले.

या देशातील नागरिकांना त्या व्यक्तीचा काही उपयोग आहे का? एवढाच माझा फक्त विषय आहे. तर तो काही नाही, तो शून्य आहे. आठवून बघा किती राष्ट्रपती झाले आणि त्यांच्यामुळे काय झाले? काहीही झालेले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल किंवा इतर कोणतेही आंदोलन आज नाही. त्यांचा काही उपयोग नाही. इतकी आंदोलनं झाली. त्यात राष्ट्रपतींनी काय केले? असल्या विषयांमध्ये ते येत नाहीत. आम्हाला मग काय फरक पडतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.