ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होण्याची शक्यता

मुंबई, दि. २४ - राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्लान तयार झाला आहे. शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ केलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री दीड लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा मुद्दाही नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणाही राज्य सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारने दीड लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यास ९२ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार राजू शेट्टी यांची आहे. शिवाय, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.