ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लॉकरमधून चोरी गेलेल्या वस्तूंसाठी बँक जबाबदार नाही - रिझर्व्ह बँक

मुंबई, दि. २६ - माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला गेल्यास बँक जबाबदार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

बँकांना लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तू किंवा दागिने चोरीला गेल्यास नुकसान भरपाईबद्दल कोणतेही निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाही समावेश आहे. लॉकर भाडेतत्त्वावर घेताना बँकेच्या ग्राहकांशी केल्या जाणाऱ्या करारात यासंदर्भात कुठलाही उल्लेख नसल्यामुळे युद्ध, आंदोलन, चोरी किंवा दरोडा अशा कुठल्याही परिस्थितीत बँकेतील लॉकरमधून कोणतीही वस्तू गहाळ झाली, तरी त्याला संपूर्णपणे संबंधित खातेदारच जबाबदार राहील, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.

माहिती कायद्याच्या अंतर्गत एका वकिलाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि १९ सरकारी बँकांना हा प्रश्न विचारला होता. बँक खातेदाराची वस्तू गहाळ झाल्यास त्याची चौकशी करण्याबाबतही कोणत्याच सूचना नसल्याचे बँकांनी सांगितले आहे. याबाबत उत्तर बँक ऑफ इंडिया, ओबीसी, पीएनबी, युको आणि कॅनरा बँकांसह अन्य काही बँकांनी दिले आहे. लॉकरच्या बाबतीत बँक आणि ग्राहकांचे नाते हे घरमालक आणि भाडेकरुसारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लॉकरमधील सामानासाठी ग्राहकच जबाबदार असतो. ग्राहकांची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या वस्तूंचा विमा उतरवावा, असा सल्लाही लॉकर भाडेतत्त्वावर देताना करारात दिला जातो.