ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसलेल्या विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू

मुंबई, दि. २८ - मुंबईत समुद्रातील भरतीच्या वेळी मरिन ड्राइव्हवर बसलेल्या तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे. १७ वर्षीय प्रिती श्रीकृष्ण पिसेला समुद्रात बुडून जीव गमवावा लागला. प्रिती कॉलेजमधील मित्र मैत्रिणींसोबत मरिन ड्राईव्हवर फिरायला आली होती. दुपारी भरतीची वेळ असताना ती कट्ट्यावर बसली होती. त्यावेळी भरतीची मोठी लाट आली आणि त्यामुळे ती समुद्राकडे खेचली गेली.

मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या लक्षात येताच तातडीनं तिला वाचवण्याचे प्रयत्न झाले, मात्र तिला वाचवण्यात यश आलं नाही. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर प्रितीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राजवळ जाऊ नका, असं आवाहन वारंवार मुंबई पोलिस आणि प्रशासनाकडे केलं जातं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं.