ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच - खासदार संभाजीराजे

औरंगाबाद, दि. २८ - शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच. शरद पवार चुकीचे काय बोलले? शिवाजी महाराज कुळवाडीभूषण आहेत, अशीच माझी स्पष्ट भूमिका आहे,' असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी (ता. २७) शाहू महाराज यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते

श्रीमंत कोकाटे यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवाजीराजे हे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, असे मत पुण्यात व्यक्त केले होते. त्या मताशी संभाजीराजे यांनी सहमती व्यक्त केले. महात्मा जोतिमा फुले यांनी शिवाजीराजांना कुळवाडीभूषण संबोधले होते. हेच संबोधन योग्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले

कोल्हापूरच्या महालक्ष्मीला घागरा-चोळी घातल्याने वातावरण चिघळले आहे; मात्र यात पुजाऱ्यांचीच चूक आहे. त्यांनी तसे करायला नको होते. तरीही या वादात मला पडायचे नाही, असे म्हणत अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला

कर्जमाफीने सगळ्याच गोष्टी साध्य होतील असे नाही. यापुढेही पीक कमी येईल, दुष्काळ पडेल, या बाबी घडतच राहतील. मात्र, कर्जमाफीची सवय पडायला नको. दरवेळेस कर्जमाफी शक् नाही. कुठेतरी "लाइन ड्रॉप' करावी लागेल, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक् केले. या वेळची कर्जमाफी ही गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

संभाजीराजे म्हणाले की, कर्जमाफीसंदर्भात माझी भूमिका ही वेळ पडली तर कर्ज घ्या; पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशीच होती. गरज नसलेल्यांना ती देऊ नका. अल्पभूधारकांना लाभ व्हावा. मागच्या चुका आता नको. या बाबींची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कर्जमाफीत आहे. कर्जमाफीसोबत आता हमीभाव मिळणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची विविध कारणे आहेत. यासाठी संघटनांनी प्रबोधन केले पाहिजे. शेतकऱ्यांकडे कार्यकर्ता नव्हे, तर शेतकरी म्हणून पाहिले पाहिजे. सरकारशी किती दिवस संघर्ष करायचा. कुठेतरी डेडलाइन ठरवायला हवी. मी नेतृत्व नाही, तर मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून काम करायला तयार आहे. चर्चा तुम्हीच करा, मुख्यमंत्र्यांकडे सन्मानाने घेऊन जाण्याची जबाबदारी मी पार पाडू शकतो, असे त्यांनी सांगितले