ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबई स्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

मुंबई, दि. २८ - मुंबईतील १९९३ च्या साखळी स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री त्याला छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणारा दोषी आरोपी मुस्तफा डोसाला काल रात्री अचानक छातीत दुखू लागलं होतं. त्यामुळे काल रात्री १ वाजता त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुग्णालयात त्याच्यावर तीन तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं. अनियंत्रित अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण आज त्याचा मृत्यू झाला.मुस्तफा डोसासारख्या खतरनाक गुंडाची तब्येत बिघडल्यामुळे काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. जेल अधीक्षकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच जे. जे. रुग्णालयात हजेरी लावली.

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुस्तफा डोसाला विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी डोसाला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. न्यायालय दोषींना काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

१२ मार्च १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जण मृत्युमुखी पडली होती. तर ७१३ जण जखमी झाले होते. एकूण २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त १० टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला