ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राज्याची परिस्थिती आभाळ फाटल्यासारखी आहे - मुख्यमंत्री

मुंबई, दि. २९ - कर्जमाफीचा भार निश्चितच राज्याच्या तिजोरीवर येणार आहे. राज्यात आधीच वित्तिय तूट आहे, ती भरून काढावी लागणार आहे. पण एकदा निर्णय घेतला की त्यातून मार्ग काढू आणि राज्याची सध्याची परिस्थिती आभाळ फाटल्यासारखी आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणतांब्याच्या संपात सहभागी झालेल्या ४० गावच्या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली. मुख्यमंत्री यावेळी बोलत होते. कर्जमाफीचा भार निश्चित राज्याच्या तिजोरीवर येणार आहे. आम्हाला सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठीच कर्ज काढावे लागणार होते, पण आता इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्जमाफी राज्य सरकारच्या मनात होते त्यामुळेच झाली. जर मनातच नसते, तर कर्जमाफी नाकारण्यासाठी अनेक कारणे होती, पण आम्हाला कर्जमाफी करायची होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असे केले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करु नका अशा सूचना वित्त विभागाने दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतीसाठी सोलार फिडर आणू, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल. राळेगणसिद्धीतून त्याची सुरुवात होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार असून समस्या संपणार नाही पण पर्याय शोधत जाऊ. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो. सरकार चर्चेसाठी नेहमी तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.