ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबईबाहेर जाणाऱ्या हायवेंवर 12 तास वाहतूक कोंडी

मुंबई, दि. ३० - गेल्या १२ तासांपेक्षा जास्त काळ मुंबईतून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जुना मुंबई-आग्रा हायवे, जुना मुंबई-पुणे हायवे, मुंबई-नाशिक हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं आहे. मुंब्रा-शीळफाटा, काल्हेर-कशेळी-कल्याण, माजीवडा नाका, माणकोली नाका या परिसरात अवजड वाहतुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे ठाण्यातून बाहेर पडणारे सगळे रस्ते जॅम झाले आहेत.

तर मुंबई-नाशिक हायवेवर तीन अवजड वाहने काही अंतरावर भररस्त्यात बंद पडल्याने रांजणोली नाक्याकडून खारेगाव टोलनाक्याकडे येणारी वाहतूक मंदावली आहे. परिणामी काल्हेर, कल्याण-भिवंडी, मुंब्रा, शिळफाट्यापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

मुंब्रा बायपास-शीळफाटा परिसरातील रस्त्यावर दोन दिवसांच्या पावसामुळे मोठे खड्डे पडले आहे. परिणामी रेतीबंदर रस्त्यावर पाणी साचल्याने जुना मुंबई-पुणे हायवे जॅम झाला आहे.

ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांच्या रांगा पनवेलपर्यंत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

याशिवा रॅन्समवेअर हल्ल्यामुळे जेएनपीटी बंदरात कंटेनर्सची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक कंटेनर्स बाहेर अडकले आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडली आहे.