ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देशाच्या विकासात जीएसटीमुळे होणार आमुलाग्र परिवर्तन - मुख्यमंत्री

मुंबई, दि. १ - वस्तू सेवा कर (जीएसटी) देशात लागू होणे ही ऐतिहासिक घटना असून, एक देश, एक कर, एक बाजारपेठ ही रचना यामुळे अस्तित्त्वात येणार आहे. तसेच देशाच्या विकासात या निर्णयामुळे आमुलाग्र परिवर्तन होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले, व्यापारात जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे अधिक सुलभता येईल. महाराष्ट्राचा यामुळे लाभ तर होणारच आहे, पण इतर अनेक राज्यांचाही यामुळे लक्षणीय विकास होणार आहे. अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. यापूर्वी व्यापार क्षेत्राची निरनिराळ्या प्रकारच्या करांमुळे अडचण होत होती. पण आता सर्व कर जीएसटीमुळे संपुष्टात येऊन देशात एकच करप्रणाली लागू होईल. व्यापार क्षेत्रासह देशाच्या विकासाला यामुळे मोठी गती मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हा कर लागू करताना सर्व पक्ष आणि विचारप्रवाहांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून यशस्वी अंमलबजावणीचा मार्ग सुकर केला. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो विशेष आभार मानतो. महाराष्ट्र सरकार अतिशय भक्कमपणे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहील, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.