ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पांडुरंगा राज्यातील शेतकरी कर्जमुक्त कर - मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे

पंढरपुर, दि. ४ - राज्यातील शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची शक्ती आम्हाला दे. शेतकरी कर्जमुक्त झाला तरच तो सुखी होईल असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरच्या पांडुरंगाला घातलं. आषाढी एकादशीनिमित्त प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पहाटे श्री विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा केली. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील बाळसमुद्र गावाच्या परशराम मेरत अनुसया मेरत या वारकरी दाम्पत्याला आज श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला.

परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया (वय ४२) अशी या भाग्यवंत दांपत्य वारकऱ्यांची नाव आहेत. व्यवसायाने शेतकरी असलेले गरीब घरातील मेरत दांपत्य गेल्या दहा वर्षापासून ते वारी करतात तर गेल्या तीन वर्षापासून ते वारीत माउलींच्या पालखीसह पायी सहभागी होत आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत मेरत दाम्पत्यानंही पांडुरंगाची विधीवत पूजा केली. पहाटे दोन वाजता महापूजेला सुरुवात झाली. सुमारे दीड तास हा विधी सुरू होता. त्यानंतर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.

पूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 'शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच आहे. पण शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत तो सुखी होणार नाही. त्याला कर्जमुक्त करता यावं. गरिबांना, वंचितांना न्याय देता यावा, असं काम करण्याची शक्ती आम्हाला दे,' असं साकडं आपण घातल्याचं ते म्हणाले. विठ्ठल माझी मागणी नक्की पूर्ण करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आषाढीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त पंढपुरी दाखल झाले असून चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा महापूर आला आहे.