ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोबाईल क्षेत्रात पुन्हा एकदा जिओ घालणार धुमाकूळ

मुंबई, दि. ५ - मोबाईल क्षेत्रात रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्याची शक्यता असून मोफत इंटरनेट सुविधा ग्राहकांना दिल्यानंतर कंपनी आता आपला नवा मोबाईल बाजारात आणण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या जी सुविधा असणाऱ्या फोनची किंमत ५०० रुपयांहूनही कमी असण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ही घोषणा नुकतीच करण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. रिलायन्सने याआधीही काही वर्षांपूर्वी मोबाईल फोन बाजारात आणला होता. ग्राहकांकडून सुरुवातीला त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता.

रिलायन्स जिओतर्फे याशिवाय नवे प्लॅन्सही बाजारात आणणार आहे. येत्या दोन दिवसात हा प्लॅन जाहीर केला जाणार असल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. हा टेरीफ प्लॅन जिओच्याधन धना धनया प्लॅनप्रमाणे असू शकतो. ही ऑफर जिओने ११ एप्रिल रोजी लॉंच केली होती.

नव्याने बाजारात येणारा जिओचा ५०० रुपयांहून स्वस्त असणारा फोन फिचर फोन असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही खऱ्या अर्थाने पर्वणी असणार आहे. टेलिकॉम विषयातील तज्ज्ञांच्या मते जिओ प्रत्येक फोनमागे ६५० ते ९७५ रुपये सबसिडी देणार आहे. अशाप्रकारे स्वस्तातील फिचर फोन लॉंच करुन जिओ आपल्य अॅक्टीव्ह युजर्सची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.