ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मुंबईतील शेतकऱ्यांची खातरजमा करा - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ५ - मुंबईमध्ये शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे. मला याबाबत काहीही माहीत नाही. पण एकदा सरकारने खातरजमा करायला हवी असा चिमटा काढत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही अधांतरी सोडणार नाही”, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

शिवसेनेच्याशिवालयया कार्यालयाचं उद्घाटन आज उद्धव यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई मेट्रोचे काम सुरू असल्याने शिवसेनेचे पक्ष कार्यालयात मंत्रालयाजवळा स्थलांतरित करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना उद्धव म्हणाले, “मुख्यमंत्री जर म्हणत आहेत की, कर्जमाफीने 89 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल तर त्यांची यादी आणि ४० लाख सातबारा कोरा झालेल्या शेतकऱ्यांची यादी आम्ही विधानसभेत मागणार आहोत. त्यावेळीच कर्जमाफीचा पारदर्शीपणा स्पष्ट होईल”.

याशिवाय मराठवाड्यासह राज्यात पुन्हा जुलैपासून मी दौरा करणार असून शेतकऱ्यांशी पुन्हा संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबईतील ८१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यलयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात ६९४ शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ११९ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.