ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

आणखी दोन बड्या नेत्यांच्या बेनामी संपत्तीवर होणार कारवाई

मुंबई, दि. ६ - आयकर विभागाने राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची तीनशे कोटींची बेनामी संपत्ती जप्त केली असून ४८ बनावट कंपन्यांच्या मदतीने भुजबळांनी एवढी मोठी बेहिशेबी मालमत्ता जमा केली. गेल्या १४ मार्च २०१६ पासून छगन भुजबळ मनी लाँड्रींगच्या गुन्ह्याप्रकरणी जेलमध्ये आहेत. तसेच महाराष्ट्राच्या आणखी दोन बड्या नेत्यांच्या बेनामी संपत्तीवर कारवाई होणार असल्याचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

आयकर विभागाने या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटीस बजावल्या आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून भुजबळ कुटुंबियांची नाशिक आणि मुंबईतील वांद्रे, पनवेल येथील मोक्याच्या ठिकाणची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांवर कारवाई होणार आहे. मुंबई महापालिकेतील माफिया ठेकेदारांवर कारवाई होणार असे भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.