ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतक-याच्या एकाच मुलाने शेतीत लक्ष घालावे - शरद पवार

तळेगाव दाभाडे, दि. ७ - सध्या लोकसंख्या वेगाने वाढत आहे. शेतीच्या वाटण्या होत असल्याने शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. शेतीतील छुपी बेकारी चिंताजनक आहे. शेतक-यांच्या सर्वच मुलांनी आता शेतीत काम करता अन्य व्यवसायही शोधला पाहिजे. शेतकऱ्यांच्या एकाच मुलाने शेती करावी, असा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला.

येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री  दिलीप वळसे पाटील, मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, तसेच चंद्रकांत सातकर, सुरेशभाई शहा, गणेश खांडगे, संतोष खांडगे आणि शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, व्यापार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विकासाच्या दृष्टीने मावळ तालुक्यातील सर्व नेतेमंडळी एकत्रित येतात ही चांगली गोष्ट आहे. तळेगाव शहराला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत तळेगावने मोठे योगदान दिले आहे, असे म्हणत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे काम व्यवस्थित सुरू असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले.

चालू शैक्षणिक वर्षांपासून शाळेची नवीन इमारत विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू झाली आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने प्राप्त करून दिलेल्या जागेवर संस्थेने स्वखर्चातून शाळेसाठी टोलेजंग इमारतीची निर्मिती केली आहे. गणेश खांडगे यांनी नेहमी बेरजेचे राजकारण करत सामाजिक, शैक्षणिक सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे अलीकडे तळेगावची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून होऊ लागली आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. मामासाहेब खांडगे यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन नव्या पिढीने काम करावे, अशी अपेक्षा कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केली.

Posted On: 07 July 2017